‘इफ्फी’च्या कामांचा मुख्यमंत्र्याकंडून आढावा

0
9

>> शुक्रवारपर्यंत कामे पूर्ण होणार असल्याची माहिती

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजनासंबंधित साधनसुविधा उभारण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला असून साधन सुविधांची उपलब्ध करण्याची सर्व कामे येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

येत्या 18 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणारा यंदाचा इफ्फीचा कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते, पणजी महानगर पालिका व इतर संबंधित खात्याच्या प्रमुखांना विविध कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कला अकादमी, कांपाल क्रीडा मैदान, ईएसजी, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम व इतर ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. आयनॉक्सच्या चित्रपटगृहात सिनेमांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. तसेच, या वर्षी पणजीतील झांट्ये यांच्या दोन चित्रपटगृहात चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
इफ्फीच्या साधनसुविधांची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी देखरेख ठेवली जात आहे. इफ्फीच्या काळात योग्य वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्थेवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी दिली.