इफ्फीच्या उद्घाटनाला सलमान खान?

0
6

>> उपस्थितीसाठी प्रयत्न सुरू; डिलायला लोबो यांची माहिती

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन समारंभाला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान उपस्थित राहण्याची शक्यता गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) उपाध्यक्ष डिलायला लोबो यांनी काल व्यक्त केली.
इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला सलमान खान याला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सलमान खानने अजूनपर्यंत उपस्थितीला दुजोरा दिलेला नाही, तरी त्याच्या हजेरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे, असेही डिलायला लोबो यांनी सांगितले.

इफ्फीच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू आहे. सुमारे चार हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. ठेकेदारांना इफ्फीच्या विविध कामांचे वितरण करण्यात आले आहे. यावर्षी मिरामार, हणजूण आणि रवींद्र भवन मडगाव येथे ओपन एअर स्क्रिनिंग केले जाणार आहे. तसेच, आयनॉक्स, मॉल द गोवाच्या थिएटरमध्ये सिनेमांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. यावर्षी सम्राट, अशोक थिएटरमध्ये सुद्धा सिनेमांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. युथ हॉस्टेल परिसरात फिल्म बाजारचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, इफ्फीनिमित्त कांपाल येथे सिने मेळा या खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, असेही लोबो यांनी सांगितले.