‘इफ्फी’ची तारीख बदलणे शक्य नाही

0
116

विष्णू वाघांकडून ठराव मागे
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जुने गोवे येथील सेंट झेवियरचे शवप्रदर्शन एकाचवेळी आले असले तरी शवप्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सरकारने समिती स्थापन केली आहे. इफ्फीची तारीख बदलणे शक्य नसल्याचे माहिती मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले. राज्यावर कोणताही ताण पडणार नाही यासाठी व आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे असे आश्‍वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर चित्रपट महोत्सवाच्या तारखा बदलण्याची मागणी करणारा ठराव वाघ यांनी मागे घेतला. सरकारने दिलेल्या उत्तराने समाधान झाल्याचे वाघ म्हणाले.