इफ्फीचा आज होणार समारोप

0
24

राज्यातील सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा समारोप मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.
या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरूगन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सांगता समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर पुरस्कार व इतर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
मागील आठ दिवसात पणजी शहर परिसरातील आयनॉक्स, सम्राट, आयनॉक्स पर्वरी येथे सिनेमांचे सादरीकरण करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवाला चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने कलाकार सलमान खान, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सिने कलाकार, दिग्दर्शक, पटकथाकारांनी उपस्थिती लावली होती.