राज्य औद्योगिक विकास महामंडळाने गुंतवणूकपूरक वातावरण निर्मितीसाठी भारतातील राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा संस्था असलेल्या ‘इन्व्हेस्ट इंडिया’शी सहकार्य करार केला. यावेळी बोलताना उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग व्यवसायासाठी इन्क्युबेशन पार्कची उभारणी करणे आणि राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन सुविधा उभारणे या कामांना जीआयडीसी आणि इन्व्हेस्ट इंडियाने प्राधान्य द्यावे, अशी सूचना केली. यावेळी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक व इन्व्हेस्ट इंडियाच्या सीईओ प्रिया रावत यांनीही आपली मते मांडली.