‘इनोसंट’ युवकाकडून 4.6 लाखांचे ड्रग्स जप्त

0
3

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने शिवोली येथे छापा घालून एका नायजेरियन युवकाला ताब्यात घत त्याच्याकडून सुमारे 4.6 लाख रुपयांचा अमलीपदार्थ काल जप्त केला. इनोसंट निझडीग्वे (23) असे अटक केलेल्या विदेशी नागरिकाचे नाव असून, त्याच्याकडून कोकेन आणि एक्स्टसी पावडर हा अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला. इनोसंट हा युवक एका वर्षापूर्वी शिक्षणासाठी भारतात आला होता. त्याने राजस्थान येथील अजमेर विद्यापीठात बीबीएसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.