केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना इंधनाच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी व्हॅट कमी न केल्याबद्दल राज्य सरकारांवरही टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ होऊनही आम्ही तेलाच्या किमतींचा समतोल राखू शकतो. कारण केंद्राने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते. परंतु, काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही, असे पुरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने व्हॅट कमी करूनदेखील काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही. त्यामुळेच व्हॅट न कमी करणाऱ्या राज्यांमध्ये तेलाच्या किमती जास्त आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन आयात करणारा देश असल्याचे यावेळी मंत्री श्री. पुरी यांनी सांगितले.