इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे सोपवा

0
3

>> राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची मागणी

इंडिया आघाडीतील एक घटक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व द्यावे. ममता यांना नेता बनवायला हवे असे विधान केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा-महाराष्ट्र आणि पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व देण्याची मागणी केली होती. त्यांनी इंडिया आघाडीतील इतर ज्येष्ठांच्या नावासाठीसुद्धा अनुकूलता दाखवली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत इंडिया आघाडीच्या निराशाजनक प्रदर्शनावर चिंता व्यक्त केली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आघाडीने एकदिलाने काम करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी त्यांनी दाखवली. आपण इंडिया आघाडीचे नेतृत्व सहज करू शकतो, अस दावा त्यांनी केला होता. मीच इंडिया आघाडीची स्थापन केली होती. आता या आघाडीचे नेतृ्‌‍त्व करण्याची जबाबदारी सांभाळायला तयार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
या सर्व घडामोडीवर काँग्रेसने प्रतिक्रिया देताना, बिहार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालपुरत्याच मर्यादीत आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय नजर नाही. त्यांच्याकडे देशातील मुद्यांची व्याप्ती जाणण्या इतपत समज नसल्याचे सांगितले. संजय राऊत यांनी याप्रकरणात कोलकत्ता येथे जाऊन ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.

इंडिया आघाडी एकसंध ः काँग्रेस

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. स्नेहशिष वर्धन पांडे यांनी ममता यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत बोलताना, आमच्या आघाडीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. आमच्या पक्षाशी संबंधित लोकांचा लोकशाहीवर विश्वास आहे. नेतृत्वाची चर्चा आहे. हे भाजपमध्ये दाखवायला हवे. हे शक्य नाही. आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. आमचे घटक संघटित आहेत. नेतृत्वाचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व आधीच होत आहे. आमचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी सांगितलेल्या गोष्टींची राष्ट्रीय पातळीवर नक्कीच चर्चा होईल असे म्हटले आहे.