इंडिया आघाडीची 1 जून रोजी बैठक

0
21

देशभरात लोकसभा निवडणुकीची गेले दीड महिने धामधूम पाहायला मिळाली. त्यात देशभरात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा राहिला आहे. त्यात 1 जून रोजी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक दिल्लीत बोलावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. अशा परिस्थितीत निकालापूर्वीच इंडिया आघाडीची दिल्लीत 1 जूनला बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. निवडणुकीनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन होणाऱ्या बैठकीत आपापसांत एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आणि पुढील तयारीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे.