इंडियाच्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा

0
6

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीची भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काल बैठक झाली. इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

या बैठकीला 19 पक्षांचे 33 नेते सहभागी झाले होते. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) संजय राऊत, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दला (आरजेडी) चे तेजस्वी यादव, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, आपचे नेते राघव चढ्ढा आणि सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

आम्ही खूप चांगले आणि एकत्र लढलो. मोदी आणि त्यांच्या राजकारणाच्या शैलीविरोधात जनादेश मिळाला आहे. हे त्यांचे वैयक्तिकरित्या मोठे राजकीय नुकसान आहे. हा त्यांचा नैतिक पराभव आहे, असे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
लोकसभा निवडणूक निकालात इंडियाला एकूण 233 जागा मिळाल्या आहेत.