‘इंडिया’च्या उमेदवारांना निवडून आणा

0
11

>> अरविंद केजरीवाल यांचे बाणावलीतील सभेत आवाहन

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल बाणावली येथे जाहीर सभा घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांना मते देऊन निवडून आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 2027 साली होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष हा सत्ताधारी भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असेल, असेही केजरीवाल म्हणाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीत आम्ही सहभागी झालो आहेत. मतदारांनी या आघाडीला पाठिंबा देऊन मतदान करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. या आघाडीत विविध विरोधी पक्ष सहभागी झालेले आहेत. ही आघाडी लवकरच जागांचे वाटप करणार असून, गोव्यातूनही ही आघाडी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे, असेही ते म्हणाले.