कोरोनाच्या नव्या बीएफ ७ व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आता अनेकजण बुस्टर डोसकडे वळत आहेत. बुस्टर डोसमध्ये आता इंट्रानेजल व्हॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणार्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस ‘कोविन ऍप’वर उपलब्ध झाली आहे. या लसीची किंमत खासगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून, त्यावर ते ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसेच सरकारी रुग्णालयात या लसीसाठी ३२५ आकारण्यात येणार आहेत.