प्रतिष्ठित मासिक ‘टाइम’ने प्रसिद्ध केलेल्या इंटरनेटवरील टॉप – ३० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींचे ‘ट्विटर’ व ‘फेसबुक’वर सुमारे ३.८ कोटी चाहते असून विशेष म्हणजे त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनाही यात मागे टाकले आहे.