
उपांत्य फेरीती पराभूत झालेल्या इंग्लंड आणि बेल्जियम या दोन तुल्यबळ संघात आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तृतीय स्थानासाठीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले असल्याने आता आपल्या तृतीय स्थान मिळवून आपले अस्तिस्त अबाधित राखण्यासाठी संघर्ष करणार आहेत.
दोन्ही संघ उपांत्य फेरीतील अपयशामुळे निश्चितच खचून गेलेले असतील. परंतु त्यांना या सामन्यात आत्मविश्वासाने मैदानावर उतरावे लागणार आहे. बेल्जिमला पहिल्या उपांत्य लढतीत फ्रान्सकडून ०-१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तर क्रोएशिनय संघाने इंग्लंडवर २-१ अशी मात केली होती. त्यामुळे दोन्ही संघ आता आपले वर्चस्व राखण्यासाठी तिसर्या स्थानासह स्वदेशी जाण्यासाठी प्रयत्न करतील. या सामन्यात इंग्लंडला बेल्जियमकडून कडवे आव्हान मिळणार हे मात्र निश्चित आहे. त्यांनी प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असल्याने प्रचंड इच्छाशक्तीनिशी ते मैदानावर उतरतील. गट फेरीतही बेल्जियमने इंग्लंडवर १-० अशी मात केली होती. आता पुन्हा एकदा त्यांचे इंग्लंडसमोर आव्हान उभे असेल. बेल्जियमसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा थॉमस म्यूनिएर या सामन्यात पुनरागमन करणार आहे आणि ती इंग्लंडसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य लढतीत बेल्जियमने शानदार खेळ केला होता. पहिल्या सत्रात त्यांनी फ्रान्सपेक्षा जास्त आक्रमणे केली होती आणि बचावफळीनेही चांगली कामगिरी केली होती. परंतु दुसर्या सत्रात गोल घेतल्यानंतर ते दबावाखाली गेले होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर दिसून आला. ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना सकर्त रहावे लागेल. लोमेलू लुकाकूला ईडन हेजार्डच्या साथीत आघाडी फळी सांभाळावी लागेल.
बेल्जियमच्या बचाफळीसमोर इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन, जेसे लिंगार्ड आणि रहीम स्टलंग यांना रोखण्याचे आव्हान असेल. हे तिघेही क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत अपयशी ठरले होते. या तिघांनी क्रोएशियाविरुद्ध गोल नोंदविण्याच्या बर्याच संधी गमावल्या होत्या. त्यामुळे ते आपल्या चुका सुधारून मैदानावर उतरणार असल्याने ते बेल्जियमसाठी धोकादायक ठरू शकतात.
अंतिम संघ यातून निवडले जातील ः बेल्जियम – तिबाउत कोर्टेरेईस, सायमन मिग्नोलेट, कोएन कास्टिल्स (गोलरक्षक), टोबी एल्डरवीरेल्ड, थॉमस वीरमाएलेन, विंसेट कोम्पानी, जॉन वटरेंघन, थॉमस म्यूनिएर, डेड्रिक बोयाटा, लिएंडर डेनडोनकेर (बचावफळी), एक्सेल विस्टल, केविन डे ब्रूने, मारुआने फेलेनी, यानिक करास्को, थॉर्गन हेजार्ड, योउरी तिएलमेंस, मोउसा डेम्ब्ले, नासेर चाडली (मध्यफळी), रोमेलू लुकाकू, ईडन हेजार्ड, ड्राइस मर्टेस, एडनान जानुजाई, मिची बात्शुयाई (आघाडीफळी).
इंग्लंड – जॉर्डन पिकफोर्ड, जॅक बुटलंड, निक पोप (गोलरक्षक), केल वॉकर, डेनी रोस, जॉन स्टोन्स, हॅरी मेग्वीर, कायरॉन ट्रिपिर, गॅरी काहिल, फिल जोन्स, फाबिया डेल्फ, ऍश्ले यंग, ट्रेंट आलेक्झेंडर आर्नोल्ड (बचावफळी), एरिक डिएर, जेसे लिंगार्ड, जॉर्डन हेंडरसन, डेले अली, रुबेन लोफ्टस चीक (मध्यफळी), हॅरी केन, रहीम स्टर्लिग, जॅमी वार्डी, डॅनी वेलबॅक, माकर्स रॅशफोर्ड (आघाडीफळी).