विश्वविजेत्या इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत ८५ धावांत गुंडाळण्याची अचंबित करणारी कामगिरी आयर्लंडच्या नवख्या संघाने केली आहे. केवळ दोन कसोटींचा अनुभव गाठीशी असलेल्या इंग्लंडने यजमानांना शंभरीदेखील ओलांडू दिली नाही. प्रत्युत्तरादाखल सर्वबाद २०७ धावा जमवत आयर्लंडने पहिल्या डावाच्या आधारे १२२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी स्वीकारली. परंतु, कर्णधार रुट याचा हा निर्णय संघाच्या अंगलट आला. ‘लॉडर्स’वर खेळण्याचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या आयर्लंडच्या टिम मुर्ता याने इंग्लंडची फलंदाजी फळी कापून काढताना केवळ १३ धावांत यजमानांचा निम्मा संघ गारद केला. पदार्पणवीर जेसन रॉय केवळ पाच धावा करू शकला. तो बाद झाल्यानंतर सुरू झालेली पडझड शेवटपर्यंत थांबली नाही. इंग्लंडची एकवेळ ७ बाद ४३ अशी केवलवाणी स्थिती झाली होती. तळाला सॅम करन व ओली स्टोन यांनी दुहेरी धावसंख्या करत संघाला शतकाजवळ नेले. मार्क अडेर व बॉईड रँकिन यांनी मुर्ताला सुरेख साथ दिली. आयर्लंडने दुसर्या डावात समाधानकारक खेळ केला. त्यांच्या आघाडीच्या पाचही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली. बालबिर्नीने आपले दुसरे कसोटी अर्धशतक ठोकत ५५ धावांचे योगदान दिले. इग्लंडकडून सॅम करन, ओली स्टोन व ब्रॉडने प्रत्येकी ३ बळी घेतले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः रॉरी बर्न्स झे. विल्सन गो. मुर्ता ६, जेसन रॉय झे. स्टर्लिंग गो. मुर्ता ५, ज्यो डेन्ली पायचीत गो.अडेर २३, ज्यो रुट पायचीत गो. अडेर २, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. मुर्ता ०, मोईन अली झे. विल्सन गो. मुर्ता ०, ख्रिस वोक्स पायचीत गो. मुर्ता ०, सॅम करन झे. मॅक्कोलम गो. रँकिन १८, स्टुअर्ट ब्रॉड झे. विल्सन गो. रँकिन ३, ओली स्टोन त्रि. गो. अडेर १९, जॅक लिच नाबाद १, अवांतर ८, एकूण २३.४ षटकांत सर्वबाद ८५
गोलंदाजी ः टिम मुर्ता ९-२-१३-५, मार्क अडेर ७.४-१-३२-३, स्टुअर्ट थॉम्पसन ४-१-३०-०, बॉईड रँकिन ३-१-५-२
आयर्लंड पहिला डाव ः विल्यम पोर्टरफिल्ड झे. लिच गो. करन १४, जेम्स मॅक्कोलम त्रि. गो. करन १९, अँडी बालबिर्नी त्रि. गो. स्टोन ५५, पॉल स्टर्लिंग पायचीत गो. ब्रॉड ३६, केविन ओब्रायन नाबाद २८, गॅरी विल्सन झे. रुट गो. स्टोन ०, स्टुअर्ट थॉम्पसन त्रि. गो. ब्रॉड ०, मार्क अडेर त्रि. गो. करन ३, अँडी मॅकब्रिन त्रि. गो. ब्रॉड ११, टिम मुर्ता झे. बर्न्स गो. स्टोन १६, बॉईड रँकिन त्रि. गो. अली ७, अवांतर १८, एकूण ५८.२ षटकांत सर्वबाद २०७
गोलंदाजी ः स्टुअर्ट ब्रॉड १९-५-६०-३, ख्रिस वोक्स १०-२-३४-०, ओली स्टोन १२-३-२९-३, सॅम करन १०-३-२८-३, जॅक लिच ३-०-२६-०, मोईन अली ४.२-१-१४-१
इंग्लंड दुसरा डाव ः जॅक लिच नाबाद ०, रॉरी बर्न्स नाबाद ०, अवांतर ० एकूण १ षटकांत बिनबाद ०
गोलंदाजी ः टिम मुर्ता १-१-०-०