इंग्लंडचा रुट भक्कम

0
190

>> बळी मिळविण्यासाठी
टीम इंडियाचा संघर्ष

कर्णधार ज्यो रुट याचे नाबाद शतक व त्याने सलामीवीर डॉम सिबली याच्यासह केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ८९.३ षटकांच्या खेळात ३ बाद २६३ अशी मजबूत स्थिती गाठली आहे. शतकी कसोटी खेळणार्‍या रुट याने आपले विसावे कसोटी शतक ठोकताना १९७ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह नाबाद १२८ धावा केल्या आहेत. दिवसातील शेवटच्या षटकात सिबली वैयक्तिक ८७ धावांवर बाद झाल्याने नवीन फलंदाज मैदानात उतरला नाही. भारताकडून जसप्रीत बुमराह याने ४० धावांत २ तर अश्‍विनने ६८ धावांत १ गडी बाद केला आहे.

भारताला दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला. जडेजाची जागा घेण्यासाठी निवडण्यात आलेल्या अक्षर पटेल याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. भारताने त्याच्या जागी शहाबाज नदीम याला संधी दिली. त्यामुळे कुलदीप यादव याला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागले. अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदरला पसंती देण्यात आली. इंग्लंडने अँडरसनला संधी देताना ब्रॉडला बाहेर बसवले. अष्टपैलू मोईन अलीला खेळविण्याचा मोह टाळताना त्यांनी बेस व लिच या श्रीलंकेत खेळलेल्या जोडीसह उतरण्याचा निर्णय घेतला.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः डॉम सिबली पायचीत गो. बुमराह ८७, रॉरी बर्न्स झे. पंत गो. अश्‍विन ३३, डॅन लॉरेन्स पायचीत गो. बुमराह ०, ज्यो रुट नाबाद १२८, अवांतर १५, एकूण ८९.३ षटकांत ३ बाद २६३
गोलंदाजी ः इशांत शर्मा १५-३-२७-०, जसप्रीत बुमराह १८.३-२-४०-२, रविचंद्रन अश्‍विन २४-२-६८-१, शहाबाज नदीम २०-३-६९-०, वॉशिंग्टन सुंदर १२-०-५५-०