आहार आणि वेदना

0
265
  • डॉ. निखिल भूमकर
    (क्रॉनिक पेन मेडिसीन विभाग, हेल्थ-वे हॉस्पिटल)

काही प्रकारच्या वेदना या केवळ वैद्यकीय उपचारांमुळेच कमी होऊ शकतात. पण पौष्टिक आहाराचे पालन केल्याने दाहामुळे होणार्‍या दीर्घकालीन वेदना कमी करता येतात. चांगले पोषण हा आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सकस आहारामुळे तुमच्या शरीराला वेदना चांगल्या प्रकारे हाताळता येते.

जर तुमच्या वेदना या दाहामुळे होत असतील तर तुम्ही काय आणि किती खाता, हा लक्षात घेण्याचा विषय आहे. सणासुदीचा काळ आणि साथीच्या रोगांमुळे हालचालींवर निर्बंध असल्यामुळे आपण काय आणि किती सेवन करतो यावर बारकाईने लक्ष ठेवणे शहाणपणाचे ठरेल.
पोषण, व्यायाम आणि झोपेच्या बाबतीत तुमचं शरीर संतुलित असणं गरजेचं आहे. पण जेव्हा हा संतुलितपणा साधला जात नाही तेव्हा वेदनेशी संबंधित परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.
दाहामुळे वेदना होतात आणि आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांमुळे ते कमी होते. दाहविरोधी आहाराचे पालन केल्याने वेदनेवर मात करण्याचा आणि दीर्घकालीन आजाराची लक्षणे कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.

मूळ जाणून घ्या…
अनेक आजारांमध्ये दाह हा असतोच, जसे आघात किंवा संसर्ग, संधिवात, दाहक आतड्यांचे आजार, मधुमेह, हिपॅटायटीस, दमा, ऑटोइम्यून डिसऑर्डर्स आणि काही कर्करोग. काही प्रकारच्या वेदना या केवळ वैद्यकीय उपचारांमुळेच कमी होऊ शकतात. पण पौष्टिक आहाराचे पालन केल्याने दाहामुळे होणार्‍या दीर्घकालीन वेदना कमी करता येतात.
चांगले पोषण हा आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सकस आहारामुळे तुमच्या शरीराला वेदना चांगल्या प्रकारे हाताळता येते.
वजन महत्त्वाचे का आहे?
जर तुम्हाला पाठदुखी, सांधेदुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या स्नायूंच्या वेदना होत असतील तर काहीतरी उचलणे आणि जड वाहून नेणे किती दुःखदायक असते हे तुम्हाला माहीत आहे. याच कारणास्तव, जेव्हा तुमचे वजन जास्त असेल तेव्हा तुम्ही अतिरिक्त पौंड वाहून नेत असता, जे तुमच्या स्नायूंवर, हाडांवर आणि सांध्यांवर अतिरिक्त वजन टाकत असतात. जेव्हा सकाळी अंथरुणावरून उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपल्याला ते अतिरिक्त वजन घेऊन फिरावे लागते आणि जर एखाद्याला काही रोग व स्नायूंची वेदना असेल तर ते या अतिरिक्त वजनामुळे अजून वाढेल.
हा आहार व वेदनेचा संबंध अद्याप स्पष्ट नसला तरी अभ्यासात असे दिसून आले आहे की, विशेषतः पोटाच्या भागात अतिरिक्त चरबी वाहून नेणार्‍या लोकांना त्यांच्या संपूर्ण शरीरात कमी दर्जाचा दाह होण्याचा धोका अधिक असतो. फायब्रोमाल्जिया, दीर्घकालीन डोकेदुखी, पोटदुखी, ओटीपोटदुखी, सांधेदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या वेदनादायक आरोग्य समस्यांमध्ये ही अतिरिक्त चरबी महत्त्वाची भूमिका बजावते.

स्निग्ध पदार्थ आणि लाल मांस
उच्च चरबीयुक्त आहार सेवन केल्यामुळे पेशी उत्तेजित होतात ज्यामुळे स्निग्ध उतींमध्ये दाह निर्माण होतो. या दाहामुळे लठ्ठपणा आणि अति वजनाशी संबंधित वैद्यकीय आजार होतात, ज्यात इन्स्युलीनचा प्रतिरोध, मधुमेह आणि हृदयरोग यांचा समावेश होतो. लाल मांस, विशेषतः प्रक्रिया केलेले लाल मांस, कोल्ड कट्‌स, सॉसेज आणि बेकनमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असते आणि पारंपरिक अमेरिकन आहाराचा भाग म्हणून नियमितपणे सेवन केले जाते तेव्हा ते कमी दर्जाच्या दीर्घकालीन दाहाशी जोडले गेले आहे.

मांसात प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते. दीर्घ काळपर्यंत अति प्रथिनांमुळे तुमच्या शरीरात दाह वाढू शकतो. व्हिटरबो विद्यापीठ आणि मेयो क्लिनिक यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की शाकाहारी लोक, जरी ते लठ्ठ किंवा स्थूल असले तरी, त्यांच्या फॅटी उतींमध्ये दाह होण्याचे प्रमाण कमी आहे.
सीफूड आणि ओमेगा-३ फॅट्‌स कशी मदत करू शकतात?
सांधेदुखी आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांमध्ये दाह आणि दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी फॅटी मासे, माशांचे तेल, फ्लॅक्स बिया आणि इतर स्तोतांमधून सेवन केलेल्या ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा संदर्भ अनेक अभ्यासांमध्ये दिसून आला आहे. तरीसुद्धा तुमच्या आहारात तुम्ही वेगवेगळ्या स्रोतांमधून स्निग्ध पदार्थांचे सेवन संतुलित प्रमाणात करत असले तरी त्या स्निग्ध पदार्थाचा प्रकार कोणता आणि किती प्रमाणात खाता हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वनस्पतिजन्य आहाराचे मूल्य
वनस्पतिजन्य आहार ही दाह, लठ्ठपणा आणि दीर्घकालीन वेदनादायक आजाराची गुरुकिल्लीच होय. तसेच पारंपरिक भारतीय शाकाहारी जेवण किंवा भूमध्य पद्धतीचा आहार हा जुनाट दाह कमी करण्यासाठी, तसेच दाहाशी संबंधित दीर्घकालीन रोगांमुळे विकसित होण्याचा किंवा मरण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. दाह कमी करण्यासाठी आपल्या आहारात फायबर वाढवा. तुमचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारातील काही किंवा सर्व मांसासाठी पालेभाज्या, सुकामेवा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या उच्च प्रथिनांच्या पदार्थांचा पर्याय ठेवा.
वनौषधी आणि मसाल्यांची भूमिका –
कित्येक शतकांपासून चायनीज वनौषधी, आयुर्वेदिक औषधे आणि इतर पर्यायी आणि पूरक प्रकारच्या आरोग्यसेवेच्या व्यावसायिकांना दाह कमी करणार्‍या वनौषधींसह इतर अनेक वनौषधी आणि मसाल्यांचे महत्त्व माहिती आहे.
अलीकडे शास्त्रज्ञांनी हळद, दालचिनी, आले, मिरपूड, गुलाबमेरी, पुदिना यांसारख्या वनौषधी आणि मसाल्यांच्या दाहविरोधी परिणामांना दुजोरा दिला आहे आणि वेदनेशी लढण्यातील भूमिकेचा ते अभ्यास करीत आहेत. आल्यातील संयुगे विशेषतः गॅस्ट्रोच्या आतड्यात प्रभावी ठरतात. मासिक पाळीच्या वेदनेची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यासाठी दालचिनी उपयोगी ठरली आहे. हळदीमुळे संधिवातातील सांधेदुखी कमी होते आणि मधुमेहाशी संबंधित विकारांची प्रगती मंदावते. रोझमेरीमधील पदार्थांमध्ये विविध प्रकारचे दाहक रोग, ब्रॉंकिअल दमा आणि पेप्टिक अल्सर यांचा मुकाबला करण्याची क्षमता असते.

आहार बदलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…
आहारातील काही बदल काही वैद्यकीय आजारांसाठी योग्य नसतील. तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे समजून घेण्यासाठी, कोणतेही आमूलाग्र बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांशी बोला.
पूरक स्वरूपात पोषक तत्त्वे, वनौषधी आणि इतर पदार्थ कधीकधी वैद्यकीय उपचारांमध्ये हस्तक्षेप करू शकतात किंवा स्वतःच्या समस्या निर्माण करू शकतात. तुम्ही कोणती जीवनसत्त्वे किंवा पूरक औषधे घेत आहात हे आहारतज्ज्ञांना सांगणेही महत्त्वाचे आहे.