येथील रेल्वे स्थानकानजीक काही विद्यार्थ्यांनी एका १५ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. सदर मुलीबरोबर तिचा शेजारी राहणारा मुलगा होता. त्याला संशयित आरोपीनी मारहाण केली. नंतर मारहाण करणार्यांनी तिच्यावर बलात्कार करून रस्त्यालगत टाकून दिले. गस्तीवरील पोलिसांनी तिला पाहिल्यानंतर तिला आसाम मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले.