आसाममधील दंगलीतील बळींची संख्या ११

0
108

आसाम-नागालँड सीमेवर काही समाजविघातक घटकांनी माजविलेल्या दंगलीतील बळींची संख्या ११ वर गेली आहे. तणावयुक्त उरियामघाट परिसरातून पोलिसांनी ९ मृतदेह ताब्यात घेतले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारपासून या भागात हिंसाचाराच्या घटना चालू आहेत.
नऊपैकी दोन मृतदेह सुखंजन व चैनपूर या खेड्यातील व्यक्तींचे असल्याची माहिती आसामची अतिरिक्त पोलीस महासंचालक ए. पी. रौत यांनी दिली.