आव्हान जिवंत राखण्यासाठी मैदानावर उतरणार पंजाब

0
275

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १३व्या पर्वातील २३वा सामना अबुधाबीच्या मैदानावर रंगणार आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी आता उर्वरित सर्व सामने ‘जिंकू किंवा मरू’ अशा स्थितीतले आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच लढती खेळलेल्या आहेत त्यापैकी त्यांनी केवळ एकाच लढतीत विजय मिळविता आलेला आहे. २ गुणांसह ते तळाला आठव्या स्थानावर आहेत. पंजाबकडे चांगली फलंदाजी असूनही त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही आहे. कमजोर गोलंदाजी विभागाचाही त्यांना मोठा फटका बसत आहे. मोहम्मद शमी सोडल्यास इतर गोलंदाज अपयशी ठरत आहेत. फलंदाजीत त्यांची मदार कर्णधार लोकेश राहुल, मयंक अगरवाल व निकोलस पूरन यांच्यावर आहे. जमेची बाजू म्हणचे त्यांचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आज खेळण्याची शक्यता आहे.

दुसर्‍या बाजूने कोलकाता नाईट रायडर्सने पाचपैकी तीन लढती जिंकलेल्या असून ते आजच्या लढतीत विजय मिळवून गुणतक्त्यात अव्वल चार संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असतील. शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मार्गन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स चालले तर त्यांना ही गोष्ट सहज शक्य आहे. राहुल त्रिपाठीने सलामीला येत गेल्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केलेली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब (संभाव्य) ः लोकेश राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाल, मनदीप सिंग, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), सिमरन सिंग, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग/दीपक हूडा, मुजीब उर रहमान, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल.
कोलकाता नाईट रायडर्स (संभाव्य) ः शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनील नारायण, नितीश राणा, दिनेश कार्तिक (कर्णधार), इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, कमलेश नगरकोटी.