आवाज दाबण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : ट्रॉजन

0
126

केंद्र सरकारने नव्याने दुरुस्त केलेल्या सीएए व एनआरसीच्या विरोधातील आंदोलन करणार्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित सीएए व एनआरसीच्या विरोधात आयोजित सभेसाठी अल्पवयीनांचा वापर केल्याप्रकरणी महिला पोलिसांनी दाखल गुन्हा हा त्याचाच एक प्रकार आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

मडगाव येथील सीएए व एनआरसी विरोधी सभेत निदर्शनासाठी अल्पवयीनांचा वापर काऊन्सिल फॉर सोशल जस्टीस ऍण्ड पीस आणि नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ ह्युमन राइट्‌स या बिगर सरकारी संस्थांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. सीएएच्या विरोधात सभा आयोजित करणार्‍याची सतावणूक करण्यासाठी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडण्यात आले आहे, असे डिमेलो यांनी सांगितले. शिक्षण खात्याच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याबाबत सरकारने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी डिमेलो यांनी केली.

सीएएला विरोध करणार्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा चिंतेचा विषय आहे. असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. रोहित डिसा यांनी केली.