आमदारकी आणि कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर हेही हजर होते. आलेक्स रेजिनाल्ड यांनी, भाजपला सत्तेवरून फक्त तृणमूल कॉंग्रेसच हटवू शकतो असे आपल्याला वाटत असल्यामुळे आपण तृणमूलमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.