आरोप मागे घेण्याची मोन्सेरात दाम्पत्याची याचिका फेटाळली

0
22

>> पोलीस स्थानक हल्लाप्रकरण

पणजी पोलीस स्थानकावर झालेल्या हल्ला प्रकरणी आपणावर ठेवलेले आरोप मागे घेण्यात यावेत अशी आमदार बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी मंत्री जेनिफर मोन्सेर्रात यांनी उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे जी मागणी केली होती ती काल न्यायालयाने फेटाळून लावली.

कनिष्ठ न्यायालयाने बाबूश मोन्सेरात तसेच त्यांच्या पत्नी जेनिफर यांच्यासह अन्य २८ जणांवर पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी आरोप ठेवावेत असा आदेश दिला होता. या पार्श्‍वभूमीवर मोन्सेरात दाम्पत्याने पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी आपणावर आरोप ठेवू नयेत, अशी मागणी एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. सदर याचिका काल उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.