राज्याच्या आरोग्य सचिव नीला मोहनन (आयएएस) यांची नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. मोहनन यांची भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा सरकारने त्यांना सेवेतून मुक्त करण्याची सूचना आदेशात करण्यात आली आहे. नीला मोहनन ह्या राज्याच्या आरोग्य, उद्योग खात्याच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कामकाज केले आहे.