मुंबईच्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कार शेड प्रकल्प बांधकाम आपण थांबवणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील आरे कॉलनीतील वनक्षेत्र, नव्याने लावलेली झाडे व तोडण्यात आलेली झाडे या सर्वांचा सचित्र अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने मनपा प्रशासनाला दिला.