आरियाल स्पोर्ट्‌स क्लबला अवरलेडी ऑफ फातिमा चषक

0
97

मडगाव (क्री. प्र.)
सां जुझे दी आरियाल स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम सामन्यात उगे रायझिंग क्लबचा २-० असा पराभव करीत डिकरपाली स्पोर्ट्‌स क्लब आयोजित अवरलेडी ऑफ फातिमा कप आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
डिकरपाली पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात सां जुझे दी आरियाल स्पोर्ट्‌स क्लबने २०व्या मिनिटाला जेस्टन फर्नांडिसने नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. तर नंतर आल्वितो मौराने आरियालच्या २-० अशा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.
विजेत्या सां जुझे दी आरियाल स्पोर्ट्‌स क्लबला रु. ४०,००० व चषक तर उपविजेत्या उगे रायझिंग क्लबला रु. ३०,००० व चषक प्राप्त झाला.
वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे ः उत्कृष्ट बचावपटू – विशाल फर्नांडिस (सां जुझे दी आरियाल), उत्कृष्ट गोलरक्षक – जोसेफ मोंतेरो (सां जुझे दी आरियाल), अंतिम सामन्यातील पहिला गोल – जेस्टन मोंतेरो (सां जुझे दी आरियाल), उत्कृष्ट स्ट्रायकर – आल्वितो मौरा (सां जुझे दी आरियाल), उत्कृष्ट मध्यपटू – आर्नोल्ड फर्नांडिस (उगे रायझिंग क्लब) यांना वैयक्तिक बक्षिसे प्राप्त झाली. बक्षीस वितरण सोहळ्याला माजी आमदार बेंजामिन सिल्वा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे वितरित करण्यात आली.