काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण विकास यंत्रणेतील २५० कर्मचार्यांना सहा महिने सेवावाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी दिली.
बैठकीसमोर विशेष कार्यक्रम नव्हता. महत्वाचा निर्णयही घेतलेला नाही. त्यामुळे बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली नाही. सांगण्यासारखे काल विशेष काही नव्हते, असे पार्सेकर यांनी सांगितले. ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या योजनांसाठी वरील २५० कर्मचार्यांची तात्पुरत्या तत्त्वावर भरती केली होती. या कामगारांसाठी विशेष कामही नाही. सरकारच्या वरील निर्णयामुळे २५० कर्मचार्यांचा पुढील सहा महिन्यांचा प्रश्न सुटला आहे.