रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजीपी) या प्रादेशिक पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा काल प्रसिद्ध केला आहे. आरजीपीच्या जाहीरनाम्यात गोव्यातील प्रश्नांना प्राधान्य देणे आणि संसदेत आवाज वाढवण्याचे वचन देण्यात आले आहे. आरजीपी पक्ष विकास, प्रादेशिक ओळख संरक्षण आणि सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. म्हादई, दुहेरी नागरिकत्व, स्थानिकांना रोजगार, जमीन संवर्धन यावर भर दिला जाणार आहे, असे मनोज परब यांनी सांगितले. आरजीपीने लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. जाहीरनामा प्रकाशनाला आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरजीपीतर्फे उत्तर गोव्यातील मनोज परब आणि दक्षिण गोव्यातून रूबर्ट परेरा निवडणूक लढविणार आहेत.