आरक्षण दुरुस्ती विधेयक बिहार विधानसभेत संमत

0
33

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काल आरक्षण दुरुस्ती विधेयक 2023 सादर करण्यात आले. ते एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.
या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 65 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.