आयोगाकडून नोकरभरतीची दुसरी जाहिरात प्रसिद्ध

0
36

>> इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागा भरल्या जाणार

गोवा कर्मचारी निवड आयोगाने नोकरभरतीची दुसरी जाहिरात काल प्रसिद्ध केली. त्यानुसार शिक्षण खात्याकडून सरकारी प्राथमिक विद्यालयात इंग्रजी शिक्षकांच्या 36 जागा भरण्यात येणार आहेत.
या प्राथमिक शिक्षक नोकरभरतीसाठी बी.एड्. पदवीधारक पात्र आहेत. गोवा कर्मचारी निवड आयोगाने सरकारी नोकरभरतीची पहिली जाहिरात 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली होती. आता नववर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी नोकरभरतीची दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली असून, नोकरभरतीची आणखी एक जाहिरात महिनाअखेरपर्यंत जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कर्मचारी निवड आयोगाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 36 जागा (यूआर 22, एसटी 14) भरण्यात येणार आहेत. या 36 जागांपैकी 9 जागा दिव्यांग आणि 7 जागा माजी सैनिक यांच्यासाठी राखीव आहेत. या नोकरभरतीसाठी वयोमर्यादा 45 वर्षे एवढी आहे.