आयोगाकडून आतापर्यंत 8889 कोटी रुपये जप्त

0
12

देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या काळात आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी जप्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत.

देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर आणि मतदारांना दाखवण्यात येणाऱ्या इतर प्रलोभनांवर निवडणूक आयोग नजर ठेऊन आहे. यामध्ये विविध संस्थांनी आत्तापर्यंत तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. अमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे तसेच इतर प्रलोभनांविरूद्ध वाढीव दक्षतेमुळे हे पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. जप्ती प्रकरणात सतत वाढ झाली आहे.
निवडणुकांवर वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अमली पदार्थाद्वारे 3958 कोटी रुपये

आयोगाने अमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे जप्त करण्यावर विशेष भर दिला आहे. आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये आहे. म्हणजे एकूण जप्तीच्या 45 टक्के इतका आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 17 एप्रिल 2024 रोजी नोएडा पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे अमली पदार्थांच्या कारखान्याचा पर्दाफाश करत 150 कोटी रुपये किमतीचा 26.7 किलो अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी दोन परदेशी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.