आयातशुल्कावरून अमेरिकेचा भारतावर पुन्हा आरोप

0
2

मद्यावर 150 टक्के, तर कृषी उत्पादनावर 100 टक्के आयातशुल्क लादल्याचा आरोप

अमेरिकेच्या वस्तूंवर भारताकडून वाढीव आयातशुल्क आकारले जाते, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच केला होता. त्यानंतर भारताकडून काही प्रमाणात आयातशुल्क कमी करण्यात आले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनीही भारतावर टीका केली. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांकडछून अमेरिकेच्या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या आयातशुल्काबाबत चर्चा केली. यावेळी भारताचा विशेष उल्लेख करण्यात आला. भारत अमेरिकेन मद्यावर 150 टक्के, तर कृषी उत्पादनांवर 100 टक्के आयातशुल्क आकारता, असे कॅरोलिन लेविट यांनी सांगितले.
कॅरोलिन लेविट यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांशी पारदर्शक आणि समतोल व्यापार वृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी त्यांनी एका चार्ट दाखवत भारत, कॅनडा आणि जपानवर टीका केली.

कॅनडा गेल्या अनेक दशकांपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत आला आहे. अमेरिकन चीज आणि बटरवर कॅनडाने जवळपास 300 टक्के आयातशुल्क लादले आहे, असे कॅरोलिन लेविट म्हणाल्या.
भारतानेही आपल्यावर भरमसाठ आयातशुल्क लादले आहे. अमेरिकन मद्यावर भारताने 150 टक्के आयातशुल्क लादले आहे. एवढा कर लादला तर आपण अमेरिकन मद्य भारतात निर्यात करू शकू का? तसेच अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर भारताने 100 टक्के आयातशुल्क लादले आहे. याशिवाय जपानही आपल्यावर 700 टक्के कर लादतो, असे कॅरोलिन लेविट यांनी सांगितले.

कॅरोलिन लेविट यांनी दाखवलेल्या चार्टमध्ये भारत, कॅनडा आणि जपान यांनी लादलेल्या आयातशुल्काची माहिती देण्यात आली आहे. भारताची माहिती देताना आल्या राष्ट्रध्वजाच्या रंगात वर्तुळ केलेले आहे, त्यात भारताच्या आयातशुल्काची माहिती देण्यात आली आहे.