आयपीएलमध्ये धोनीपासून रहा सावध

0
138

>> इरफानने दिला गोलंदाजांना इशारा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने महेंद्रसिंह धोनी निवांत झालेला असून आयपीएलमध्ये तो निश्‍चितच पूर्ण क्षमतेनिशी मैदानावर उतरणार. त्यामुळे सर्व त्याच्या विरुद्ध खेळणार्‍या सर्व गोलंदाजींनी सावध राहण्याचा इशारा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने स्टार स्पोर्टस्‌वरील एका कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि अँकर जतिन सप्रू यांच्याशी बोलताना दिला आहे.

भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७३व्या स्वतंत्र्यदिनी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आकस्मिक निवृत्तीची घोषणा करीत आपल्या चाहत्यांना व आजी-माजी खेळाडूंनाही जोरदार धक्का दिला होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने आता तो निवांत झाला असेल असे इरफानचे मत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळपट्टीवर फलंदाजीसाठी उतरताना तो पूर्ण क्षमतेनिशी उतरणार आहे. त्यामुळे तो जेव्हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येईल तेव्हा सर्व गोलंदाजांना, माझ्यासारख्या निवृत्त झालेल्यानांही त्याला गोलंदाजी करायला आवडेल, असे इरफानने सांगितले.

पठाणने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रेंचायजीबद्दल असलेल्या प्रेमाबद्दलही सांगितले. जेव्हा तो सीएसकेकडून खेळतो तेव्हा खेळाची पूर्ण मजा लुटतो. फलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट होत आलेली आहे, असे पठाणने सांगितले.
धोनी २००८साली आयपीएल सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून कार्यरत आहे. आपल्या कुशल नेतृत्वाखाली त्याने सीएसकेला २०१०, २०११ आणि २०१८मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवून दिलेले आहे. सध्या तो आयपीएलपूर्व प्रशिक्षणासाठी संघासमवेत चेन्नईत आहे. हे शिबिर २१ ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यानंतर दुसर्‍या दिवशी संघ यूएईला रवाना होणार आहे.