आयटी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी ः मुख्यमंत्री

0
145

>> व्हायब्रंट गोवा परिषदेचा आज समारोप, केंद्रीय मंत्री गोयल यांची उपस्थिती

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन राज्याच्या आर्थिक व उद्योग क्षेत्रात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयटी गोवा बिझनेस स्कूलने व्हायब्रंट गोवा परिषदेत आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना काल केले.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात, गोवा विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. वरुण साहनी व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, तीन दिवसीय व्हायब्रंट गोवा शिखर परिषदेचा समारोप आज शनिवार १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. या समारोप सोहळ्याला केंद्रीयमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार आहेत.

व्हायब्रंट परिषदेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भूतान, कॅनडा, चीन, रशियन, मलेशिया, सिंगापूर येथील व्यापारी शिष्टमंडळाशी काल चर्चा केली. व्हायब्रंट गोवा जागतिक उद्योग परिषद आणि प्रदर्शन २०१९ मध्ये पहिल्या दोन दिवसांतच परराष्ट्र व्यापार प्रतिनिधी मंडळ आणि गोवा चेंबर ऑङ्ग कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) आणि व्हायब्रंट गोवा ङ्गाउंडेशन यांच्यात तब्बल १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.