आयटकची आज पणजीत रॅली

0
27

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि संलग्न कामगार संघटनातर्फे बुधवार दि. 1 मे रोजी सकाळी 9.30 वाजता राजधानी पणजीमध्ये कामगार दिनानिमित्त रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला सकाळी 9.30 वाजता पणजी कदंब बसस्थानकाजवळून प्रारंभ होणार आहे. रॅलीचा समारोप आझाद मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून कामगारावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला जाणार आहे, अशी माहिती आयटकचे उपाध्यक्ष कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर यांनी दिली.