आयकर विभागाच्या छाप्यात 350 कोटींची रक्कम जप्त

0
10

आयकर विभागाने विविध राज्यात काल टाकलेल्या छाप्यांत 350 कोटी रुपयांचीरक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने काल ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये छापे टाकले. मद्यविक्री, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था चालविण्याऱ्या तसेच विक्री व्यवसायांशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील 10 जिल्ह्यांमध्ये ही कारवाई झाली. आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये 350 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली असून 2.80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा आणि तितलागढ आणि संबलपूर जिल्ह्यातील खेतराजपूर या छोट्या शहरांमध्येज्ञात निवासस्थानांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील 329 कोटी रुपयांच्या या रोख रकमेचा मोठा हिस्सा जप्त करण्यात आला आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरुपात काही पुरावे सापडले आहेत.