आयकर विभागाने गेल्या 2 दिवसांपासून उत्तर गोव्यातील कळंगुट, वागातोर, शिवोली, मोरजी आदी समुद्रकिनारी असलेल्या सुमारे 40 आस्थापनांवर कर चुकवेगिरी आणि न नोंदवलेल्या रोख उत्पन्नासाठी छापे टाकले आहेत. छापे घातलेल्या आस्थापना प्रामुख्याने पब, बार आणि रेस्टॉरंट्स यांचा समावेश आहे. सुमारे 60 जणांच्या घरांवरही आयटी पथकाने छापे टाकले. हवाला चॅनलद्वारे परदेशात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित करण्यात आणि अवैध रोख हस्तांतरणामध्ये सहभागी असलेल्या कथित मध्यस्थांच्या शोधासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.