‘आयएसएल’चा थरार

0
155
  • सुधाकर रामचंद्र नाईक

अखिल भारतीय ङ्गुटबॉल महासंघाच्या सहयोगात २०१४ पासून ‘हिरो आयएसएल’ या प्रतियोगितेस प्रारंभ झालेला असून सातवे पर्व ‘कोरोना’ महामारीच्या वातावरणात ‘बायो सिक्योर बबल’ नियमावलींतर्गत गोव्यात होणार आहे.

हिरो इंडियन सुपर लीगचा थरार गेल्या शुक्रवारपासून गोव्यात सुरू झालेला असून ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्‍वभूमीवर यंदा संपूर्ण प्रतियोगिता नेहरू स्टेडियम ङ्गातोर्डा (मडगाव), ऍथलेटिक स्टेडियम (कुजिरा, बांबोळी) आणि टिळक मैदान (वास्को) या तीन स्टेडियम्सवर होणार आहे. बहुचर्चित तथा विलक्षण लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीगच्या धर्तीवर दर्जेदार, नामवंत विदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली ही प्रतियोगिता आयपीएलप्रमाणेच भारतीय ङ्गुटबॉलप्रेमींसाठी दर्जेदार ङ्गुटबॉल पर्वणी, उत्साहवर्धक मेजवानी ठरलेली आहे.

भारतीय ङ्गुटबॉलला प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय स्तर गाठून देण्यासाठी आयएमजी-रिलायन्स आणि स्टार स्पोर्टसतर्ङ्गे टायटल स्पॉन्सर ‘हिरो मोटोकॉर्ङ्ग’ तथा अखिल भारतीय ङ्गुटबॉल महासंघाच्या सहयोगात २०१४ पासून ‘हिरो आयएसएल’ या प्रतियोगितेस प्रारंभ झालेला असून सातवे पर्व ‘कोरोना’ महामारीच्या वातावरणात ‘बायो सिक्योर बबल’ नियमावलींतर्गत गोव्यात होणार आहे. तीन वेळचा विजेता एटीके मोहन बगान, दोन वेळचा विजेता चेन्नईन एङ्गसी, विजेता बंगळूर एङ्गसी, केरला ब्लास्टर्स, एङ्गसी गोवा, मुंबई सीटी एङ्गसी, नॉर्थ ईस्ट युनायटेड, जमशेदपूर एङ्गसी, हैदराबाद एङ्गसी, ओडिशा एङ्गसी आणि एङ्गसी ईस्ट बंगाल असे अकरा संघ विद्यमान प्रतियोगितेत भाग घेत आहेत.

२०१४ मध्ये आशियाई ङ्गुटबॉल कन्ङ्गेडरेशनच्या मान्यतेविना सुरू करण्यात आलेल्या या प्रतियोगितेचा प्रारंभ आठ संघांसह झाला. भारतीय ङ्गुटबॉलची ‘मक्का’ गणल्या गेलेल्या कोलकात्याच्या एटीकेने शुभारंभी प्रतियोगिता जिंकली आणि आपले आधिपत्त्य जारी राखताना आतापर्यंत सर्वाधिक तीन वेळा जेतेपदाचा मान मिळविलेला आहे. लढवय्या चेन्नईन एङ्गसीने दोन वेळा तर उमद्या बंगळूर एङ्गसीने एकदा जेतेपद मिळविले आहे. दमदार एङ्गसी गोवा आणि केरला ब्लास्टर्स यांना मात्र प्रत्येकी दोन वेळा जेतेपदाची संधी हुकली. या अनुषंगाने आजवरच्या सहा विजेत्यांच्या कामगिरीची दखल घेणे औचित्याचे ठरेल.

२०१४ : एटीके : हिरो इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) शुभारंभ कोलकात्यातील सॉल्ट स्टेडियमवरील एटीके आणि मुंबई सिटी एङ्गसीमधील लढतीने झाला. एटीकेने सुभारंभी मुकाबल्यातच आपले बलसामर्थ्य प्रगटविताना मुंबई सिटी एङ्गसीवर ३-० असा एकतर्ङ्गी विजय मिळविला. स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनिओ लोङ्गेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकाता संघाने तंत्रशुद्ध, शिस्तबध्द खेळी तथा जिगरबाज बचावतंत्रात आपला प्रारंभिक संवेग अखेरपर्यंत जारी राखीत प्रतिष्ठेच्या हिरो आयएसएल चषकावर नाव कोरणारा पहिला संघ बनण्याचा मान प्राप्त केला. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम मुकाबल्यात एटीकेने लढवय्या, तूल्यबळ केरला ब्लास्टर्सवर १-० अशी मात केली. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम मुकाबल्यात कोलकाता संघाचा निर्णायक, विजयी गोल ९२व्या मिनिटाला भारतीय खेळाडू मोहम्मद रङ्गिकने हेडरद्वारे नोदवीत एटीकेला शुभारंभी आयएसएल जेतेपदाचा मान मिळवून दिला.
२०१५ ः चेन्नईन एङ्गसी : इटालियन ङ्गुटबॉलपटू मार्को मॅटेराझी यांच्या आधिपत्याखालील चेन्नईन एङ्गसी संघाची आयएसएल मोहीम डळमळीत ठरली होती, पण अंतिम टप्प्यात जोरदार मुसंडी मारीत सलग चार सामने जिंकून ‘प्ले ऑफ्स’मध्ये स्थान मिळविले आणि उपांत्य लढतीत विजेत्या ऍथलेटिको दी कोलकाताचे कडवे आव्हान मोडून काढीत अंतिम ङ्गेरीत धडक मारली. चेन्नईनने आपली नाट्यमय आगेकूच जारी राखताना ङ्गातोर्डा स्टेडियमवरील अंतिम मुकाबल्यात यजमान एङ्गसी गोवावर ३-२ असा विस्मयकारी विजय नोंदवीत पहिल्या जेतेपदाचा मान प्राप्त केला. स्थानिक एङ्गसी गोवा संघ अखेरची दहा मिनिटे असेपर्यंत २-१ असा आघाडीवर होता आणि ङ्गुटबॉलवेडे गोवेकर जवळ जवळ आंनदोत्सव साजरा करण्याच्या उत्साहात होते. पण अंतिम क्षणातील नाट्यमय घडामोडीत ‘गोल्डन बूट’ विजेत्या स्टीवन मेन्डोझाने अवघ्या काही मिनिटांत चक्क दोन गोल नोंदवीत एङ्गसी गोवाची जेतेपदाची संधी हिरावली.

२०१६ ः एटीके : ऍथलेटिको दी कोलकाताने आयएसएलमधील आपले श्रेष्ठत्व पुनर्प्रस्थापित करीत तीन वर्षांत दुसर्‍यांदा जेतेपदाचा मान मिळविला. मुख्य प्रशिक्षक अंतोनिओ लोपेझ हबास यांना हटवून एटीकेने स्पॅनिश प्रशिक्षक जोस ङ्ग्रान्सस्को मोलिना यांच्याकडे संघाची सूत्रे सोपविली आणि त्यांच्या कल्पक मार्गदशर्ंनाखाली कोलकाता संघाने बहारदार कामगिरी करून दुसर्‍यांदा अंतिम ङ्गेरी गाठली आणि जेतेपदही पटकावले. कोची येथे सुमारे ६० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या अंतिम मुकाबल्यात उभय संघांनी निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी गाठली आणि अखेर टायब्रेकरमध्ये एटीकेने ४-३ अशी बाजी मारीत केरला ब्लास्टर्सला दुसर्‍यांदा जेतेपदापासून विन्मुख बनविले.

२०१७-१८ : चेन्नईन एङ्गसी : तीन वर्षांनंतर हिरो आयएसएल प्रतियोगितेला आशियाई ङ्गुटबॉल कन्ङ्गेडरेशनची (एएङ्गसी) मान्यता लाभली आणि ‘प्ले ऑङ्ग विनर्स’ना एएङ्गसी प्रतियोगितात सहभाग होण्याचा मान लाभला. एएङ्गसीची मान्यता लाभल्याने बंगळूर एङ्गसी आणि जमशेदपूर एङ्गसी या दोन नव्या संघांना प्रवेश देण्यात येऊन संघसंख्या दहावर नेण्यात आली. भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीचा समावेश असलेल्या तथा स्पॅनिश ङ्गुटबॉलपटू अल्बर्ट रॉका यांच्या आधिपत्याखालील बंगळूर एङ्गसीने बहारदार कामगिरीत अंतिम ङ्गेरीत धडक दिली आणि अंतिम लढतीच्या यजमानपदाचा मानही मिळविला. पण इंग्लिश ङ्गुटबॉलपटू जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदशर्ंनाखालील चेन्नईन एङ्गसीने स्वशौकिनांच्या पाठिंब्यात खेळणार्‍या बंगळुरू एङ्गसीवर ३-२ असा झुंजार विजय मिळवीत दुसर्‍यांदा आयएसएल चषकावर मोहोर लगावीत एटीकेशी बरोबरी साधली.

२०१८-१९ ः बंगळूर एङ्गसी : पदार्पणात थोडक्याने जेतेपद हुकलेल्या बंगळूर एङ्गसीने दुसर्‍या प्रयत्नात जेतेपद मिळवीत एटीके आणि चेन्नईन एङ्गसीची आयएसएलमधील ‘मोनोपॉली’ संपुष्टात आणली. अल्बर्ट रॉका यांच्या मार्गदर्शनाखालील लढवय्या बंगळूर एङ्गसीने प्रारंभापासून आपले वर्चस्व जारी राखीत लीगतक्त्यातही अग्रस्थान राखले आणि अखेर अंधेरी स्टेडियमवर (मुंबई) झालेल्या अंतिम मुकाबल्यात बहरातील एङ्गसी गोवावर १-० असा निसटता विजय मिळविला. बंगळुरू आणि एङ्गसी गोवामधील तुल्यबळ संघातील मुकाबला निर्धारित वेळेत गोलशून्य राहिला आणि अखेर ११७व्या मिनिटाला राहुल बेके याने हेडरद्वारे नोंदलेल्या विलक्षण गोलवर बंगळुरू एङ्गसीने जेतेपदावर नाव कोरले आणि गोव्याला दुसर्‍यांदा उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले.

२०१९-२० एटीके : गतवर्षीच्या मोसमात एटीकेने पुन्हा एकदा अंतोनिओ लोपेझ हबास यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे सुपर्द केली आणि किमयागार स्पूनिश प्रशिक्षकाने आपली गुणवत्ता सिध्द करीत कोलकाताला तिसर्‍यांदा हिरो आयएसएल जेतेपदाचा मान मिळवून दिला. गेल्या दोन मोसमांतील अपयशानंतर एटीकेने संघात बदल घडविताना नव्या तेजतर्रार खेळाडूंचा समावेश केला आणि रॉय कृष्णा आणि डेविड विलियम्स या दमदार खेळाडूंच्या कामगिरीवर कोलकाता संघाने आपला विजयसंवेग साधला. ङ्गातोर्डा स्टेडियमवर झालेल्या अंतिम मुकाबल्यात बहारातील एटीकेने चेन्नईन एङ्गसीवर ३-१ असा सहजसुंदर विजय मिळवीत तिसर्‍यांदा प्रतिष्ठेचा हिरो आयएसएल चषक जिंकला.

इंडियन सुपर लीगमध्ये भारतीय ङ्गुटबॉलला एक नवा आयाम लाभलेला असून युवा दमाच्या, नैपुण्यकुशल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक, ज्येष्ठ-श्रेष्ठ खेळाडूंच्या सहयोगात खेळण्याची संधी लाभत असून मान्यवंत खेळाडूंच्या उपस्थितीत आपले ङ्गुटबॉल कौशल्य प्रगटविण्यासाठी हा उत्तम मंच लाभलेला आहे. आयएसएलचे सातवे पर्व पूर्णतया गोव्यात असले तरी कोरोनामुळे नव्या नियमावलीखाली विनाक्षेक्षक स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. पण ङ्गुटबालवेड्या गोमंतकीयांना स्टार स्पोर्टस वाहिनीवर खेळाचा आनंद निश्‍चित लुटता येईल. स्वशौकिनांच्या उपस्थितीचे पाठबळ नसले तरी स्वगृहाच्या अनुकूलतेत एङ्गसी गोवा यंदा तिसर्‍या प्रयत्नात हिरो आयएसएल चषकावर नाव कोरील अशी अपेक्षा करूया!

आयएसएलचे सातवे पर्व पूर्णतया गोव्यात असले तरी कोरोनामुळे नव्या नियमावलीखाली विनाक्षेक्षक स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. स्वशौकिनांच्या उपस्थितीचे पाठबळ नसले तरी स्वगृहाच्या अनुकूलतेत एङ्गसी गोवा यंदा तिसर्‍या प्रयत्नात हिरो आयएसएल चषकावर नाव कोरील अशी अपेक्षा करूया!