राज्यातील कोविड तज्ज्ञ समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत फातोर्डा मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) अंतिम सामना प्रेक्षकांच्या १०० टक्के उपस्थितीत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. फातोर्डा येथील स्टेडियमवर येत्या २० मार्चला आयएसएलचा अंतिम सामना होणार आहे. हा अंतिम सामना पाहण्यासाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले किंवा ७२ तासांपूर्वी कोविड निगेटिव्ह अहवाल असलेल्या प्रेक्षकांना प्रवेश द्यावा. हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार्यांनी मास्क आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.