आम आदमी पक्षाचे सर्व आरोप बिनबुडाचे : भाजप

0
5

नोकरी घोटाळ्याची सरकारकडून गंभीर दखल

आम आदमी पक्षाने राज्यातील सरकारी नोकरभरतीसंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी काल केला.

आम आदमी पक्षाने सरकारी नोकरभरती प्रश्नी राज्य सरकारला दोष देण्याचा केलेला प्रयत्न दिशाभूल करणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी नोकरी घोटाळा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे आपने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही वेर्णेकर यांनी म्हटले आहे.

सरकारी नोकऱ्या गुणवत्ता आणि पारदर्शक पद्धतीने दिल्या जात आहेत. त्यामुळे कुणीही सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष देणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. सरकारी नोकरीसाठी कुणीही पैसे घेतलेले असल्यास त्याच्या विरोधात तक्रार दाखल करावी. याबाबतची निःपक्षपाती चौकशी केली जाणार आहे, असेही वेर्णेकर यांनी म्हटले आहे.