‘आम्हाला कमी लेखू नका’

0
231

>> भारत बायोटेकचे आवाहन

भारत बायोटेक ही कोरोनावरील लस उत्पादन करणारी देशी कंपनी असली तरी केवळ त्यामुळे तिला कमी लेखू नका आम्ही जागतिक दर्जाचे लस उत्पादक आहोत, असे स्पष्टीकरण भारत बायोटेकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले. भारत बायोटेक ही हैदराबादची कंपनी असून तिला तिसर्‍या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांपूर्वीच परवानगी देण्यात आल्यावरून काल कॉंग्रेससह विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्याला उत्तर देताना डॉ. एल्ला यांनी सांगितले की, आपल्या कंपनीने १२ देशांमध्ये यशस्वी चाचणी घेतली असून कंपनीपाशी पुरेसा अनुभवही आहे. आजवर आम्ही १६ पेक्षा अधिक लशी बनवल्या असून सध्या होणारी टीका गैर आहे.