आमोणा साखळीमधून भाजपचा प्रचार सुरू

0
16

भाजपने काल गुरूवारपासून निवडणूक प्रचाराची सुरुवात साखळी मतदारसंघातील आमोणा येथून केली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, न्याय, सत्य, विकास हा भाजपचा धर्म आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा भाजपचा मूलमंत्र आहे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोव्याचे निवडणूक प्रभारी टी. रवी यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहे. गोव्यातही डॉ. प्रमोद सावंत यांनी चांगले काम करुन जनतेमध्ये लोकप्रिय झाले असल्याचे नड्डा म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, भाजपच्या गोव्यातील निवडणूक तयारीचा शुभारंभ साखळी मतदारसंघातून होतो आहे ही भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले.
ढोल ताशांच्या मिरवणुकीने श्री. नड्डा, मुख्यमंत्री डॉ. सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना देवी सातेरी मंदीरात नेण्यात आले. नंतर मान्यवरांनी देवींचे दर्शन घेऊन गोव्यातील निवडणुकीचा शुभारंभ करण्यासाठी आशीर्वाद घेतले.