आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्री सावंतांशी चर्चा

0
248

कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांची पर्वरीतील विधानसभा संकुलात भेट घेतली. गोव्यात राबविली जाणारी कचरा व्यवस्थापन पद्धती उत्कृष्ट असून आपल्या मतदारसंघात या पद्धतीची कार्यवाही करण्याची इच्छा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
नितेश राणे म्हणाले की, गोव्यातील कचरा व्यवस्थापन पद्धतीची देशभरात प्रशंसा होत आहे. सिंधुदुर्गमध्ये अशी व्यवस्था राबविण्यासाठी या पद्धतीचा आम्हाला अभ्यास करायचा आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या संदर्भात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामामुळे आपण प्रभावित झाल्याचेही त्यांनी सांगितले.