आमदार अपात्रतेस विलंब; 2 आठवड्यांत उत्तर द्या : सर्वोच्च न्यायालय

0
23

काँग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना विनाविलंब अपात्र ठरवावे, यासाठी सभापती रमेश तवडकर यांना आदेश द्यावा, या मागणीसाठी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी प्रतिवादींना न्यायालयाने 2 आठवड्यांची मुदत काल दिली.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. व्ही. भट्टी यांच्यासमोर सुनावणी काल झाली. न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर दाखल करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आणि त्यानंतर चोडणकर यांना प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी हिवाळी सुट्टीनंतर होणार आहे.