काँग्रैस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, यासाठी काँग्रेस पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर निवाडा देण्यास विलंब केल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे.
सभापतींनी ही याचिका प्रलंबित ठेवल्याने लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन तर झाले आहेच. शिवाय ती गोष्ट घटनाबाह्यही असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी काँग्रेस पक्षाच्यावतीने ॲड्. कार्लुस फेरेरा हे बाजू लढवणार आहेत. आम्ही न्यायासाठी लढतच राहणार आहोत, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई व रुडॉल्फ फर्नांडिस या आमदारांनी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केला
होता.