मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 20 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली असून, सभापतींना तीन महिन्यात त्यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा निर्देश देण्याची विनंती याचिकेत केली आहे.
या याचिकेवर ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी युक्तिवाद काल केला. येत्या 20 एप्रिल रोजी याचिकेवर चोडणकर यांच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू केला जाणार आहे.