पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याने आपला सर्वोत्तम सर्वकालीन विश्वचषक खेळाडूंचा संघ नुकताच जाहीर केला असून यात भारताच्या विराट कोहली याला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात ५ खेळाडू पाकिस्तानचे आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर, पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणार्या इम्रान खान याचा संघात समावेश नाही.
आफ्रिदीने सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा सईद अन्वर आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट यांना निवडले आहे. तिसर्या स्थानासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याची निवड त्याने केली आहे. जॅक कॅलिस व वसिम अक्रम यांच्या रुपात दोन अष्टपैलू संघात आहेत. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आणि ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक तर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि लेगस्पिनर शेन वॉर्न यांना आफ्रिदीने पसंती दिली आहे.