करमळे-केरी येथील तरुण नितेश केरकर (३१) याचा रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास स्वयंअपघाताने मृत्यू झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीला त्याच्या दुचाकीची धडक बसल्याने तो ठार झाला. नितेश करमळे येथे राहत होता. तो फोंड्यातील कार्यक्रम आटोपून घरी येत असताना त्याला हा अपघात घडला. नितेशच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो काही काळ तसाच पडून राहिला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास लोकांच्या दृष्टीस पडल्याने त्याला इस्पितळात नेले मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.