दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ‘आप’ पक्षाला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे काल ईडीने उच्च न्यायालयात सांगितले.
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर काल सुनावणी होत असताना ईडीच्या वकिलांनी ही माहिती दिली. एखाद्या पक्षालाच सहआरोपी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.