पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ‘आप’ला दिल्लीवरील आपत्ती असे संबोधल होते. त्या टीकेला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. दिल्लीवर आपत्ती कोसळल्याचे पंतप्रधानांनी अनेकदा सांगितले आहे. आपत्ती दिल्लीवर नाही, तर भाजपवर आली आहे, असा टोला केजरीवाल यांनी मोदींना लगावला.
तीन प्रकारच्या आपत्ती आहेत, पहिली आपत्ती- भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नाही. दुसरे म्हणजे, दिल्लीत निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढायच्या आहेत, हेच भाजपला माहीत नाही. तिसरे म्हणजे, निवडणुका कोणत्या रणनीतीने लढवायच्या आहेत, याची देखील माहिती नाही, असे केजरीवाल म्हणाले. 43 मिनिटांच्या भाषणात त्यांना (पंतप्रधान) स्वत:चे कोणतेही काम सांगता आले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.